Loading...

हीच ती वेळ आहे...

आपल्या स्वप्नांमधली फळबाग फुलवायची !

पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून ‘एकतरी झाड जगवा ! हा आजच्या युगाचा संदेश आहे. या संदेशाप्रमाणे आपण वागलो, तर ही वसुधा पुन्हा ‘हरितश्यामल’ बनेल. त्यामुळे आजच निर्धार करूया आणि एकसाथ पुन्हा ते घोषवाक्य म्हणुया, झाडे लावा आणि झाडे जगवा!

आत्ताच संपर्क करा
nursery-Image
जाणून घ्या

थोडं आमच्याविषयी !

रत्नागिरी जिल्ह्यातील हरचिरी ह्या निसर्गरम्य ठिकाणी १९९३ पासून ‘महालक्ष्मी नर्सरी’ कार्यरत आहे. महालक्ष्मी नर्सरी ही कोकणातील सर्वात मोठी आणि यशस्वी नर्सरी असून ती सुमारे १० एकरांवर पसरलेली आहे आणि ज्याचे व्यवस्थापन सुप्रसिद्ध उद्योजक श्री. विनोद प्रभुदेसाई करत आहेत. श्री. विनोद प्रभुदेसाई ह्यांनी काजू आणि हापूस आंब्याच्या कलमांपासून ह्या व्यवसायाला सुरुवात केली. हा प्रवास आता ५० पेक्षा जास्त प्रकारच्या फळांच्या कलमांपर्यंत येऊन पोहोचला आहे. सखोल अभ्यास, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहकाभिमुख सेवा ह्या वैशिष्ट्यांमुळे महालक्ष्मी नर्सरी आपले वेगळेपण टिकवून आहे. काजू, हापूस आणि केशरसह अनेक प्रकारचे आंबे, फणस, नारळ, सीताफळ, रामफळ, हिरवा साखरजाम, लाल साखरजाम, लाल फणस, अवाकाडू, अनिल कापा फणस, पॉंड्स सोनचाफा, ऑरेंज डॉर्फ, ८ फुटी हापूस कलमे, लाल केळी, काळी मिरी, बहाडोली जांभूळ आणि इतर प्रकार, नागचाफा डॉर्फ, परदेशी फळझाडांचे प्रकार अशी अनेक कलमे ग्राहकांनी नेऊन त्यांच्या बागेत यशस्वीरित्या लागवड केली.

divider
आमच्याकडे केवळ निर्यात-मानांकित, मूळ जातीची रोपे उपलब्ध आहेत.

उपलब्ध रोपे

divider
Red-Jackfruit

लाल फणस

लाल फणस हे सदाहरित झाड असून याची पाने जाड व कणखर असतात. लाल फणसाची झाडे मुख्यतः उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये लागवड केली जातात.

Anil-Jackfruit

अनिल फणस

महालक्ष्मी नर्सरीमध्ये विकसित केलेली ही जात तीन ते पाच वर्षांत फळ देण्यास सुरुवात करते आणि योग्य देखभालीने झाडे १०० वर्षांपर्यंत जगू शकतात.

Avocado

अ‍ॅव्होकाडो

अ‍ॅव्होकाडो हे त्याच्या उच्च पोषक मूल्यांमुळे विशेष लोकप्रिय आहे. याची समृद्ध चव आणि मऊ पोत यामुळे ते विविध पदार्थांमध्ये वापरले जाते.

sonchafa

सोनचाफा

मायकेलिया (वैज्ञानिक नाव: Michelia champaca) हे भारतातील मूळचे एक सुंदर, उंच वाढणारे झाड आहे. हे झाड साधारणतः ५ ते १० मीटरपर्यंत वाढते. सदाहरित असलेले हे झाड रस्त्यांच्या कडेला (अ‍ॅव्हेन्यू प्लांटेशन) लागवडीसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते.

Nag chafa

नागचाफा

नागचाफा हे सुगंधी फुलांसाठी प्रसिद्ध असून त्याच्या लाकडाचा वापर लाकूडकामासाठीही केला जातो. या झाडाची शेंडी अरुंद व सजावटीच्या आकाराची दिसते. या रोपांना पूर्ण सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. या झाडाच्या फुलांवर मधमाश्या येतात आणि त्यांचा परागीभवनासाठी उपयोग होतो.

Surangi

सुरंगी

मॅमिया सुरिगा, ज्याला मराठीत “सुरंगी” म्हणून ओळखले जाते, हे सुगंधी पांढरी फुले देणारे मध्यम आकाराचे झाड आहे. या झाडावर सुंदर गोलसर कळ्या येतात आणि त्या उमलताना चार पाकळ्यांची मनमोहक पांढरी फुले तयार होतात. याचा परागीभवनासाठी उत्तम उपयोग होतो.

आमची खास वैशिष्ट्ये

म्हणूनच आपण आम्हाला निवडले पाहिजे

divider
original-plant
मूळ जातीची रोपे
आमच्याकडे केवळ निर्यात-मानांकित, मूळ जातीची उच्च गुणवत्तेची रोपे उपलब्ध आहेत.
Quality
गुणवत्तापूर्ण सेवा
आम्ही आमच्या ग्राहकांना विश्वासार्ह आणि उत्कृष्ट गुणवत्ता सेवा प्रदान करतो.
Affordable
वाजवी दर
आमचे दर स्पर्धात्मक असून आमच्या गुणवत्तेला पूर्णपणे न्याय देतात.
Service
विक्रीनंतरची सेवा
ग्राहकांना WhatsApp वर मोफत वनस्पती व रोगनिवारण मार्गदर्शन मिळते. प्रत्यक्ष, सखोल सल्ल्यासाठी नर्सरीला भेट देणे आवश्यक आहे, जिथे अनुभवाचे थेट मार्गदर्शन मिळेल.