Loading...

आमच्याबद्दल

divider
nursery-Image
जाणून घ्या

थोडं आमच्याविषयी !

रत्नागिरी जिल्ह्यातील हरचिरी ह्या निसर्गरम्य ठिकाणी १९९३ पासून ‘महालक्ष्मी नर्सरी’ कार्यरत आहे. महालक्ष्मी नर्सरी ही कोकणातील सर्वात मोठी आणि यशस्वी नर्सरी असून ती सुमारे १० एकरांवर पसरलेली आहे आणि ज्याचे व्यवस्थापन सुप्रसिद्ध उद्योजक श्री. विनोद प्रभुदेसाई करत आहेत. श्री. विनोद प्रभुदेसाई ह्यांनी काजू आणि हापूस आंब्याच्या कलमांपासून ह्या व्यवसायाला सुरुवात केली. हा प्रवास आता ५० पेक्षा जास्त प्रकारच्या फळांच्या कलमांपर्यंत येऊन पोहोचला आहे. सखोल अभ्यास, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहकाभिमुख सेवा ह्या वैशिष्ट्यांमुळे महालक्ष्मी नर्सरी आपले वेगळेपण टिकवून आहे. काजू, हापूस आणि केशरसह अनेक प्रकारचे आंबे, फणस, नारळ, सीताफळ, रामफळ, हिरवा साखरजाम, लाल साखरजाम, लाल फणस, अवाकाडू, अनिल कापा फणस, पॉंड्स सोनचाफा, ऑरेंज डॉर्फ, ८ फुटी हापूस कलमे, लाल केळी, काळी मिरी, बहाडोली जांभूळ आणि इतर प्रकार, नागचाफा डॉर्फ, परदेशी फळझाडांचे प्रकार अशी अनेक कलमे ग्राहकांनी नेऊन त्यांच्या बागेत यशस्वीरित्या लागवड केली.

divider

भविष्यातील उद्दिष्टे आणि ध्येय

divider
gif-icon
उच्च दर्जाची रोपे निर्मिती
ग्राहकांना नेहमी निरोगी, प्रमाणित आणि उच्च गुणवत्तेची फळझाडांची रोपे उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख ध्येय.
gif-icon
आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार
नर्सरी उत्पादन, कलमबांधणी आणि झाडांची निगा राखण्यासाठी आधुनिक, वैज्ञानिक आणि प्रगत तंत्रज्ञान सतत वापरणे.
gif-icon
कोकणातून राज्यभर तसेच अनेक राज्यांमध्ये विश्वास
कोकणापुरतेच नव्हे तर महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांतील विश्वसनीय नर्सरी म्हणून सातत्यपूर्ण विस्तार आणि प्रतिष्ठा निर्माण करणे.
gif-icon
विविध प्रजातींचे संवर्धन
देशी–विदेशी फळझाडांच्या विविध, दुर्मिळ आणि मूल्यवान प्रजाती जतन करून त्यांचे संवर्धन व गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढवणे.
gif-icon
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
लागवड, प्रजाती निवड, रोग व्यवस्थापन आणि उत्पादनवाढ याबाबत शेतकऱ्यांना व्यावहारिक व मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.
gif-icon
ग्रामीण युवकांसाठी संधी
नर्सरी आणि बागायती क्षेत्रात ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण, रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करून स्थानिक विकासाला गती देणे.
divider

नर्सरीला भेट द्यायची आहे का?

रोपे पाहण्यासाठी आणि सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आजच अपॉइंटमेंट बुक करा.

आत्ताच संपर्क करा